हातकणंगले पंचायत समितीच्या प्रांगणावर होणाऱ्या परेडसाठी सन्मति विद्यालयातील लेझीम पथकाची निवड

उद्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन सर्वत्र अगदी उत्साहाने साजरा केला जाणार आहे. प्रत्येक शाळांमध्ये झेंडा वंदन केले जाते तसेच अनेक विविध कार्यक्रम घेतले जातात. हातकणंगले तालुक्यातील सन्मति विद्यालय या शाळेच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे. शाळेतील लेझीम पथकाला २६ जानेवारीच्या राष्ट्रीय पर्वाला होणाऱ्या परेडमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे. ही निवड शाळेच्या विद्यार्थिनींच्या कठोर मेहनतीचे आणि त्यांच्या कलागुणांचे प्रतीक आहे. हातकणंगले पंचायत समितीच्या प्रांगणावर होणाऱ्या या परेडमध्ये सन्मति विद्यालयाचे लेझीम पथक आपल्या मनमोहक लेझीमच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेईल, यात शंका नाही.

या कार्यक्रमसाठी गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आर. सी. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मती विद्यालयाचे लेझीम पथक या कार्यक्रमासाठी सखोल तयारी करत आहे. लेझीम पथक आता तालुक्याच्या पातळीवर आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी विद्यार्थिनी उत्सुक आहेत. आळते केंद्रप्रमुख शहाजी पाटील आणि मुख्याध्यापक सी.जी.तेरदाळे, पर्यवेक्षक पद्मभूषण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींना अधिकच उत्साह मिळत आहे.