ज्या ग्रामपंचायतींनी घरफाळा व पाणीपट्टी शंभर टक्के वसुल केली नाही अशा ग्रामपंचायतींना विकास फंड मिळणार नाही, असा कायदा येत्या काही दिवसात होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी कटाक्षाने घरफाळा व पाणीपट्टी वसुल केली पाहिजे तसेच नागरिकांनीही पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन अरुणराव इंगवले यांनी केले. ते लक्ष्मीवाडी येथे खा. धैर्यशील माने यांच्या फंडातून व अरुणराव इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
लक्ष्मीवाडी गावास भविष्यात आणखीन फंड देवून गावचा विकास करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. माजी सरपंच तात्यासो हांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये गावचा विकासाबाबत व अजून अपूर्ण कामाबाबत लेखाजोखा यावेळी आपल्या मनोगतातून मांडला. या कार्यक्रमास सरपंच शुभांगी ढोले, उपसरपंच आक्काताई खोत, सुरेश हांडे, पोपट खोत, संदीप हांडे, तुकाराम झलग, राजाराम झलग, बबन खोत, नारायण हांडे, दिपक झलग, आप्पासो झलग, करण इंगवले, उपअभियंता मिसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
