सध्या सरकारतर्फे एसटी भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यास अनुसरून हातकणंगले बस स्थानकासम र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळो की पळो करून सोडेल असा इशारा जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला.
तसेच गोरगरीब व सामान्य जनतेचा प्रवासाचा आधार असलेल्या एस.टी. बसेसची अन्यायकारक केलेली भाववाढ तात्काळ मागे घ्यावी, तसेच प्रवाशांना योग्य त्या सेवा सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन हालकणंगले एस.टी. आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य महेश चव्हाण यांनी देखील आपल्या मनोगतामधून शासनाने केलेली भाववाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा दिला.