वाळवा, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने सभासद, बिगर सभासद, गेटकेन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम १ कोटी ५२ लाख ४२ हजार ५३७ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खातेवर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी दिली.
यावेळी बोलताना वैभव नायकवडी म्हणाले, कारखान्याने उच्चांकी ऊस दराची व शेतकऱ्यांच्या देय रक्कमा वेळेवर देण्याची परंपरा कायम राखली आहे. हुतात्मा कारखाना सदैव शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणेसाठी कटिबध्द आहे कारखान्याचा येणारा गळीत हंगाम सुरु करणेकरीता मशिनरी देखभाल, दुरुस्तीची ऑफ सिझन मेटेनन्सची कामे गतीने चालू आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, चांगल्या ऊस रोपांचा वापर करुन एकरी जास्तीत जास्त उत्पादन काढावे. कारखान्याने चांगल्या, निकोप, दर्जेदार ऊस रोपांची निर्मिती सुरु केली असून सदर रोपे खरेदी करुन शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. कारखान्याचे उद्दिष्टाप्रमाणे गाळप होणेसाठी शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गळीतासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन रामचंद्र भाडळकर, संचालक, खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
