पुलाची शिरोलीत शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र शिबिरास प्रारंभ! शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन….

सध्या सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जातात. जेणेकरून त्याचा लाभ शेतकऱ्यांना पुरेपूर लाभ मिळेल.शिरोली येथे शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. आ. अमल म हाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व लोकनियुक्त सरपंच सौ. पद्मजा करपे यांच्या अध्यक्षतेखाली छ. शिवाजी महाराज सभागृह, ग्रामपंचायत हॉल येथे या शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिराचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन आ. अमल महाडिक यांनी केले. सदरचे ओळखपत्र शेतीच्या सर्व लाभासाठी  आवश्यक असणार आहे.

यावेळी उपसरपंच बाजीराव पाटील, तलाठी महेश सूर्यवंशी, नागेश तोंदरोद, ग्रामविकास अधिकारी गीता कोळी, मंडल अधिकारी सीमा मोरे, महसूल सेवक संदीप पुजारी, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपसरपंचकृष्णात करपे माजी सरपंच राजेश पाटील, उदय पाटील, धनाजी पाटील, दीपक यादव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, गावातील ज्येष्ठ व शेतकरी बांधव सर्व कर्मचारी उपस्थित होते.