इस्लामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक निधी करून देऊ कपील ओसवाल यांची ग्वाही….

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत तर काही भागात विकासकामे करण्यासाठीची मागणी केली जात आहे. इस्लामपूर शहरात देखील अनेक विकासकामे सुरु आहेत. इस्लामपूर येथील मुस्लीम समाजाच्या दफनभूमी (कब्रस्तान) सुशोभिकरणाचे काम स्वखर्चातून केल्याबद्दल माजी नगरसेवक कपिल देवीचंद ओसवाल यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, टोपी, रुमाल, अत्तर व फुलगुच्छ देऊन सत्कार समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मुस्लीम समाज हा नेहमीच ओसवाल परिवाराच्या पाठीशी उभा असतो. मुस्लीम समाजाला कोणात्याही विकास कामासाठी निधी कमी पडून देणार नाही. आमचे नेते राहुल महाडिक, सम्राट महाडिक व गौरव नायकवडी यांच्या माध्यमातुन जास्तीत जास्त निधी इस्लामपुरच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही कपील ओसवाल यांनी दिली. कपिल ओसवाल यांनी स्वखर्चातून सुशोभिकरण केल्याबद्दल व अमीर हवलदार यांनी पाठपुरवठा केल्याबद्दल मुस्लीम समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे.