खानापूर तालुक्यात कुस्त्यांचे जंगी मैदान, सरपंच किताब कसेरीचा थरार…..

सध्या प्रत्येक गावात अनेक कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये मनोरंजन तसेच सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच अनेक विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. यामध्ये बैलगाडी, घोडागाडी त्याचप्रमाणे अनेक भागात जंगी कुस्त्या देखील घेतल्या जातात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती यात्रेनिमित्त खानापूर तालुक्यातील अगस्त्यनगर येथे कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवारी म्हणजेच 18 फेब्रुवारीला आयोजन केले असल्याची माहिती सरपंच दाजीभाऊ पवार यांनी दिलेली आहे.

यामध्ये पहिल्या प्रथम क्रमांकासाठी सरपंच किताब केसरीसाठी पैलवान विक्रमकुमार हरियाणा व पैलवान जलाल इराणी यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी पैलवान पागल बाबा व पैलवान अब्दुल्ला पश्चिम बंगाल यांच्यामध्ये टक्कर होणार आहे. या कुस्त्यांसाठी अनुक्रमे दोन लाख 51 हजार व दोन लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. याबरोबर अनेक कुस्त्या देखील होणार आहेत.

या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, पैलवान चंद्रहार पाटील, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या जंगी कुस्त्यांचा आस्वाद घेण्याचे आवाहन अगस्त्यनगर मधील नागरिकांनी केलेले आहे.