सांगोल्यात शिवप्रेमी उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन….

बुधवारी म्हणजेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. या पार्श्ववभूमीवर अनेक भागात जय्यत तयारी सुरु आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सांगोल्यात देखील जय्यत तयारी झालेली आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवप्रेमी उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६ वा. शहरातील महात्मा फुले चौक येथे सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यासह सायं. ०७ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवमुर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सायं. ८ वा. मुली व महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रात्री १० वा. शिवप्रेमी सर्व मुली व महिलांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा व स्फूर्ती गीते या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०६ वा. छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस अभिषेक व पुजन, सकाळी ८ वा. समस्त शिवप्रेमी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व कार्यक्रमास सुरुवात होईल.

तसेच सकाळी ९ वा. सांगोला शहरातील व तालुक्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या सर्व गुणवंत खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न होणार आहेत. तसेच ०९:३० वा. सांगोला शहरातुन सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करीत, अभिवादन करून भव्य दिव्य रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅली दरम्यान विशेष आकर्षण म्हणून, घोडे, हालगी, नाशिक ढोल, उंट, मावळे, डॉल्बी, मल्लखांब, दांडपट्टा आदी समावेश असणार आहे.

तसेच सर्व शिवप्रेमी महिलांच्या वतीने सांगोला मुकबधीर शाळा व वृध्द आश्रम येथे खाऊ शालेय वह्या. पुस्तक तसेच विविध वस्तू वाटप करण्यात येणार आहे. दिनांक २१ रोजी सायंकाळी ०६ वाजता जागर ग्रामीण साहित्याचा निमंत्रित कवी संमेलन कवी ज्ञानेश डोंगरे व कवी शिवाजीराव बंडगर व इतर कवी यांचा कवी संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. २२ रोजी सकाळी ०९ ते सायं ०६ वाजेपर्यंत सांगोला शहरातील व तालुक्यातील गरजु रुग्णांना शासनाच्या सर्व मोफत योजनांची माहिती व मदत केली जाणार आहे.

आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ सांगोला येथे संपन्न होणार आहेत. अशी माहिती शिवप्रेमी उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने देण्यात आली आहे.