इचलकरंजीतील उद्योजकांचा दिल्लीत डंका; जागतिक कापड प्रदर्शनात पंचवीस उद्योजकांचा सहभाग

विकेंद्रीय क्षेत्रातील वस्त्रोद्योगामध्ये इचलकरंजीचे नांव देशासह परदेशात पोहचले आहे. शहराला मैचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते. शहर परिसरात साध्या यंत्रमागापासून अँटोलूमवर वेगवेगळ्या कॉलीटीचे कापड उत्पादन केले जाते. शहर परिसरातील विविध प्रकारच्या कापडाला देशातंर्गत तसेच परदेशात मोठी मागणी आहे. इचलकरंजीतील कापड उत्पादन चांगल्या कॉलिटीचे असते अशी छाप सर्वच कापड बाजारपेठेत आहे. शहर परिसरातील काही प्रसिद्ध कापड उत्पादक  आपल्या उत्पादित माल परदेशाला पाठवत असतात.

नवी दिल्ली येथील ‘भारत मंडपम” मध्ये १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत भरविण्यात आलेल्या ‘भारत टेक्स एक्सपो २०२५’ या जागतिक कापड प्रदर्शनामध्ये इचलकरंजी शहर परिसरातील २५ उद्योजकांनी सहभाग घेतला होता. या उद्योजकांसाठी “इचलकरंजी पॅव्हेलियन” या नावाने स्वतंत्र भव्य स्टॉल उभारण्यात आला होता. चार दिवस चाललेल्या कापड प्रदर्शनामध्ये इचलकरंजीच्या उद्योजकांच्या उत्पादनाला चांगली मागणी मिळाली. त्यामुळे इचलकरंजी शहराचे नाव आता जागतिक पातळीवर पोहचले आहे.

सहभागी झालेले उद्योजक

जागतिक पातळीवरील प्रदर्शनामध्ये इचलकरंजी शहर परिसरातील करवीर टेक्स्टाईल, डीकेटीई, भगवती टेक्स्टाईल, धनलक्ष्मी टेक्स्टाईल अँन्ड क्रिएशन, करनी टेक्स्टाईल इंडस्ट्रिज एलएलपी, मुंदडा ॲन्ड मुंदडा, जीआरजीएच टेक्सटाइल, अरविंद डाग ॲन्ड ब्लिचिंग मिल्स प्रा.लि., इचलकरंजी सटलेस फैब्रिक मैन्युफैक्चरर्स असोसिएशन, हरमनी इकमा कॉटव प्रा.लि., अरिहंत सिकोटेक्सस मिल्स प्रा.लि. प्रेमचंद पत्राचंद, विष्णू फाँटसीन प्रा. लि., ज्युबिली डाईंग ॲन्ड प्रिंटीग मिल्स प्रा.लि.. श्री. राधाकृष्ण एक्सपोर्ट महालक्ष्मी टेक्स क्लोथिंग प्रा.लि., सारा फॅब्रिक्स बोवेनटेक्स (इंडिया) प्रा.लि., वेरिएंट टेक्स्टाईल एलएलपी, तोतला टेक्स्टाईल, बलदेव टेक्स्टाईल, बांगड ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज