इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांची मजरेवाडी उपसा केंद्रास भेट

इचलकरंजी शहराची पाणीटंचाई खूपच जगजाहीर आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. सतत लागणारी गळती यामुळे शहरवासीयांना पाच ते सात दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. इचलकरंजी शहरात पाणीपुरवठा होत असलेल्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मजरेवाडी उपसा केंद्रा नजीकच्या पाईपलाईनला गळती लागली होती.

या ठिकाणचे गळती काढण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेणेत आलेले होते. आयुक्त पल्लवी पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन गळती काढणे च्या कामाची पाहणी करून सदर काम तातडीने पूर्ण करणे च्या सुचना संबंधित मक्तेदार आणि कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांना दिले. याचबरोबर मजरेवाडी उपसा केंद्राची पाहणी करून कृष्णा पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी अभियंता बाजी कांबळे यांचेसह उपसा केंद्रामध्ये काम करणारे कर्मचारी उपस्थित होते.