इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून खूपच जगजाहीर आहे. अनेक लोक परगावहून कामानिमित्त इचलकरंजी शहरात स्थायिक झालेले आहेत. विकासकामे या शहरात मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. तसेच अनेक विकासकामे करण्यास प्रारंभ देखील होत आहे. पण या शहरातील राजाराम स्टेडियमची मात्र अवस्था खूपच बिघडलेली आहे. इचलकरंजी येथील राजाराम स्टेडीयमची प्रेक्षक गॅलरी मद्यपींचा अड्डा बनला आहे.
संध्याकाळी अनेक तळीराम तुटलेल्या गेटमधून प्रेक्षक गॅलरी मध्ये प्रवेश करतात. मद्यपान झालेनंतर रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी फोडल्या जातात त्यामुळे त्या ठिकाणी फटलेल्या काचा आणि बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. या तळीरामांचा तातडीने बदोबस्त करावा अशी मागणी गाळेधारकांतून होत आहे.
इचलकरंजी येथील राजाराम स्टेडीयम च्या प्रेक्षक गॅलरी मध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक ठिकाणी गेट बसवले आहेत. त्यापैकी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दक्षिण बाजूला असणारे गेट हे खराब होवून तुटलेले आहे. याच गेटमधून तळीराम प्रेक्षक गॅलरी मध्ये प्रवेश करतात. सायंकाळ झाली कि अनेक तळीरामांची टोळकी राजाराम स्टेडीयम मध्ये प्रवेश करतात. सोबत आणलेल्या मद्याच्या बाटल्या यथेच्छपणे रिचवल्या जातात. रिकाम्या झालेल्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकल्या जातात अथवा फोडल्या जातात.
त्यामुळे फोडलेल्या बाटल्यांच्या काचा प्रेक्षक गॅलरीतून मैदानावर येवून पडतात. सदरच्या काचा अनेकवेळा सराव करणाऱ्या खेळाडू तसेच सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी येणाऱ्या नागरीकांच्या पायामध्ये घुसत असतात. मैदानावर पडलेल्या काचा बाटल्या अनेकवेळा खेळाडूंनी गोळा करून ठेवल्या आहेत. याबाबत वारंवार तक्रारीही झाल्या आहेत परतु कारवाई मात्र होताना दिसत नाही.
सदरचे गेट हे जाणारे येणाऱ्या वाहनधारक अथवा नागरिकांच्या सहजपणे निदर्शनास येत नाही. त्यामुळे रात्री उशिरा काही प्रेमीयुगल ही प्रणय क्रिडा करण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून या ठिकाणाचा वापर करत असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले आले आहे. तळीरामांमध्ये दररोज वादावादीचे प्रकार घडतात याचा त्रास खाली असणाऱ्या गाळेधारकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने या तळीरामांचा व प्रेमीयुगलांचा कायमचा बदोबस्त करून व सदर ठिकाणी नवीन गेट बसवावे अशी मागणी होत आहे.
