आष्ट्यात उद्या स्वामी पादुका दर्शन सोहळा, हजारो भाविक राहणार उपस्थित..

सध्या प्रत्येक भागात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम देखील मोठया श्रद्धेने पार पाडले जातात. उद्या मंगळवारी म्हणहेच २५ फेब्रुवारीला जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पूर्वनियोजित पादुका दर्शन सोहळा सकाळी ९ वाजता हेवन हॉल आष्टा तासगाव रोड आष्टा येथे आयोजित केलेला आहे.सदर सोहळ्यासाठी जिल्ह्यातून हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत.

जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांची भव्य  मिरवणूक, संत पिठावर आगमन, गुरुपूजन, नरेंद्राचार्य जी महाराज यांचा उपासक दीक्षा, दर्शन व पुष्पवृष्टी, महाप्रसाद असे धार्मिक विधी 
आरती, प्रवचन,होणार आहेत.  भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा, पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वस्वरूप संप्रदाय सांगली जिल्हा भक्तसेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले
आहे.