काल महाशिवरात्री सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक कार्यक्रमांचे आयोजन भागाभागात केलेले होते. वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा यांच्यावतीने महाशिवरात्री निमित्त ३६ फूटी भव्य शिवलिंग, १२ ज्योर्तिलिंग दर्शन व सृष्टीचक्र – राजयोग चित्र प्रदर्शन दोन दिवसीय अध्यात्मिक महाअनुभूती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. माजी अध्यक्ष देवराज पाटील, लोकनियुक्त सरपंच कल्पना गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच किरण पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी माळी, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश गावडे, ग्रा. पं. सदस्य अतुल लहिगडे, दादासाहेब पाटील, माजी ग्रा. पं. सदस्य संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, निवास पाटील, मानसिंग पाटील, सदाशिव पाटील, बांबवडेचे सरपंच भिमराव ताटे, धोत्रेवाडीचे माजी सरपंच रामभाऊ माळी, पश्चिम भाग सोसायटी चेअरमन मोहन पाटील, उद्योजक शंकर गावडे, डॉ. संदीप पाटील, विजय जाधव, महेंद्र पाटील, गणेश साठे, सोमनाथ जंगम उपस्थित होते.
या सोहळ्यात शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन महाशिवरात्रीचे अध्यात्मिक महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. वसंतदादा ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीर व कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रीसर्च सेंटरच्या वतीने देहदान संकल्प शिबीर पार पडले. कासेगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट दिली. ब्रह्माकुमारी पद्या बेहेनजी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ब्रह्माकुमारी उर्मिला बेहेनजी यांनी आभार मानले.