सध्या अनेक भगत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात. यामध्ये बैलगाडी शर्यत खूपच फेमस झाली आहे. त्याचप्रमाणे घोडागाडी शर्यतीचे शौकीन आहेत. माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त वैभव दादा शिंदे युवा मंचच्या वतीने घोडा गाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते जनरल खुल्ला गट नवतर गट अशा दोन गटात स्पर्धा झाल्या.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव दादा शिंदे आष्टा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विशाल भाऊ शिंदे आष्टा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष बाबासो सिध्द यांच्या हस्ते घोडा गाडी शर्यतीला सुरुवात झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे,युवा नेते वरदराज शिंदे ,विश्वराज शिंदे, अमर शेळके सौरभ पाटील, रोहित मिरजकर प्रमुख उपस्थित होते. नवतर गटामध्ये बारा गाडीने सहभाग घेतला.
तर जनरल खुल्या गटात दहा गाड्यांनी सहभाग नोंदवला प्रथम विजेत्यास विश्वराज युथ फाऊंडेशन यांच्यातर्फे पाच हजार रुपये रोख रक्कम व ढाल देण्यात आली, द्वितीय क्रमांक विजेत्यास सौरभ पाटील यांच्याकडून रोख तीन हजार रुपये ढाल देण्यात आली तृतीय क्रमांक वैभव दादा शिंदे युवा मंच वतीने रोख रक्कम दोन हजार रुपये व ढाल देण्यात आली नवतर विजेते पुढीलप्रमाणे १ अमोल माने बाबा लाड वाळवा २ खंडू खोत डिग्रज ३ रवी महाराज वाठार जनरल खुल्ला विजेते पुढीलप्रमाणे शकील कराडकर बागणी १०१० आष्टा बादल कारंदवाडी छबी यांचे नंबर देण्यात आले
