शिमला येथे हॉटेलला लागलेल्या आगीत वाळवा तालुक्यातील युवक ठार

वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथील तीन युवक हिमाचल प्रदेशमधील मृत रितेश पुदाले, जखमी आशिष शिंदे, जखमी अवधूत पाटील शिमला येथे पर्यटनासाठी गेले होते. काचीघाट परिसरातील हॉटेल ‘बेड अॅण्ड ब्रेकफास्ट’ला रात्री उशिरा भीषण आग लागली. त्यात गाढ झोपेत असणारा रितेश रमेश पुदाले (वय २४, रा. रा.कोरेगाव, ता. वाळवा) हा युवक भाजून जागेवरच मयत झाला, तर त्याचे दोन मित्र अवधूत बाळासो पाटील (वय २५ व आशिष आनंदा शिंदे वय २६. दोघेही रा. कोरेगाव) जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, शिमला येथे दाखल करण्यात आले आहे. आगीत हॉटेलच्या तीन खोल्या जळून खाक झाल्या.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अर्धा डझन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. रितेश पुडाले असे मृत पर्यटकाचे नाव असून आशिष आणि अवधूत पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (आयजीएमसी) येथे दाखल करण्यात आले आहे. तिघेजण सिमला येथे फिरण्यासाठी आले होते. हॉटेल मालक मनोज शर्मा यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, सिमला पोलिसांनी मृत रितेश पुडालेच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली आहे. आगीचे नेमके कारणे शोधण्यासाठी पोलिस हॉटेल व्यवस्थापनाची चौकशी करीत आहेत.