आटपाडी तालुक्यातील करगणीत श्री लखमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरांचे प्रदर्शन

आटपाडी तालुक्यातील करगणीत येथे श्री लखमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य खिलार जनवरांचे प्रदर्शन आज सोमवारी आयोजित केल्याची ,माहिती कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती संतोष पुजारी व करगणी गावचे सरपंच सुरेखा व्हाणमाने यांनी दिली प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही करगणीत श्री लखमेश्वर देवाची यात्रा भरविली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व करगणी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने यात्रेचे आयोजन केले जात आहे. आज सोमवारी खिलार जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांनी केले आहे.