हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे अंधाराचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग 

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे महिलेचा अंधाराचा फायदा घेऊन विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने विरोध करताच केस धरून खाली पाडत मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य केल्याने हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भरमू उर्फ पिंटू भागोजी बोरगावे असे संशयीत आरोपीचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील फिर्यादी या आपल्या मालकीच्या शेतात काम करतात.

याच भागातील महिला २८ फेब्रुवारी रोजी सौंदत्ती डोंगर येथे देवदर्शनास गेल्या होत्या. त्या १ मार्चला परत आल्यावर रात्री ११ च्या सुमारास पीडित महिला एकटीच घरी परतत असताना संशयीत आरोपी भरमू उर्फ पिंटू बोरगावे याने अचानक मागून येत गळ्याला व केसांना धरत थेट रस्स्यावर ओढत नेत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विरोध केला असता या महिलेला रस्त्यावर लाथा दुक्क्यांनी मारहाण केली व किती वेळ लागतो फक्त पाच मिनिटे असे घाणेरडे शब्द वापरून अंगाशी झोंबाझोंबी करीत लज्जा उत्पन्न होईल असे शब्द उच्चारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पीआय एन. आर. चौखंडे करीत आहेत.