इस्लामपूर येथे महिला शरदचंद्र पवार पक्षाची पुणे अत्याचार घटनेतील गाडेला कडक शिक्षा करण्याची मागणी

पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडे यास कडक शिक्षा करावी, अशी मागणी इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, प्रदेश प्रतिनिधी कमल पाटील यांनी पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले. यावेळी स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. हवलदार अझर गवंडी यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पाटील, साधना ताटे, गीता पाटील, सुहासिनी जंगम, अंजना चव्हाण उपस्थित होत्या.