इस्लामपूर येथील राजारामबापू सहकारी बँकचा देशातील प्रमुख २३ शेड्यूल्ड बँकेत समावेश

आपणा सर्वांच्या सहकार्यानि राजारामबापू सहकारी बँक देशातील प्रमुख २३ शेड्यूल्ड बँकेत एक बनली आहे. आम्ही गेल्या ४४ वर्षांपासून लोकनेते राजारामबापू पाटील यांचे आदर्श व माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली समाजातील विविध घटकांना आर्थिक ताकद देत आहोत, असा विश्वास राजारामबापू सह. बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी व्यक्त केला. राजारामबापू सहकारी बँकेच्या साखराळे शाखेचा ४१ वा वर्धापनदिन व ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९८१ साली बँकेची स्थापना केली आहे.

आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या ४८ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना अद्यावत सोईसुविधा देत आहोत. तत्पर सेवा व ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. यावेळी कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी मार्गदर्शन केले. शाखेचे ग्राहक चंद्रशेखर पाटील, टी. एम. बावर सुधीर चिवटे, नजमुनिसा संदे यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नवेखेडचे माजी सरपंच प्रदीप चव्हाण, साखराळेचे माजी सरपंच बाबुराव पाटील, डॉ. प्रीती पाटील, कारखान्याचे सचिव डी. एम. पाटील, संतोष खटावकर, खातेदार सुरेश कदम, विजयराव पाटील, सयाजी कदम, संताजी गावडे, श्रीहरी पाटील, गुलाबराव पाटील, सतिश पाटील, विनायक यादव, बँकेचे जनरल मॅनेजर श्रेणीक मगदूम, सूर्यकांत जाधव, मच्छिंद्र मोरे यांच्यासह सभासद व ग्राहक उपस्थित होते.