वाळवा तालुक्यातील बहादुरवाडी येथील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कवितासंग्रहास गोवा येथील गोमंतकीय साहित्य सेवक संस्थेच्यावतीने देण्यात येणारा पहिलाच कै. ब्रह्मराज उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गोवा आणि महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या कवितासंग्रहातून या संग्रहाची उत्कृष्ट संग्रह म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रदीर्घ परंपरा आणि वाङ्मयीन क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी गोमंतक साहित्य सेवक मंडळ संस्था ९८ वर्षे जुनी असून आजअखेर तिचं काम अविरतपणे सुरू आहे. संस्था दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कलाकृतींचा पुरस्कार देऊन गौरव करते. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातून कवी लेखकांच्याकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी दिली.
