हातकणंगले तालुक्यातील ‘संजय गांधी’ च्या ९५४ लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर

हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक शुक्रवार २८ मार्च रोजी संपन्न झाली. या समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे हि बैठक पार पडली. या बैठकीत ९५४ प्रस्तावापैकी सर्वच्या सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मार्च महिन्यात २ वेळा मीटिंग घेऊन सर्व प्रस्तावांचा निपटारा करण्यात आला.

यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव सुशीलकुमार बेल्हेकर, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड, अमोल गावडे, महेंद्र शिंदे, दौलत पाटील, सुदाम इंगवले, संदेश भोसले, तानाजी ढाले, संजय देसाई, सौ. कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.