पंढरपूर शहरांमध्ये तसेच उपनगरीय भागामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक मिलिंद गायकवाड ठिकाणी नगरपरिषदेच्या शासकीय जमिनीवरही अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, प्रशासन व प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अन्यथा ९ एप्रिल रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड यांनी दिला आहे.
गायकवाड यांनी दि. २८ जुलै २०२२ तसेच दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजी पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाकडे पंढरपुरातील पालखी मार्ग उपनगर असलेल्या इसबावी हद्दीतील तसेच पंढरपूरच्या विविध भागात नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन दिले होते. प्रशासनाने निवेदनाबाबत दखल घेतली नाही.
