नरंदेत चोरी; पावणेतीन लाखाचा ऐवज लंपास

हातकणंगले,नरंदे (ता. हातकणंगले) येथे अज्ञात चोरट्याने बंद घरातील तिजोरी फोडून २ लाख ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली. यामध्ये नेकलेस, मनिमंगळसुत्र आणि लक्ष्मी हार अशा दागिन्यांचा समावेश आहे. याबाबतची वर्दी संजय यादव कांबळे (वय ६०) यांनी हातकणंगले पोलीसात दिली आहे. चोरीस गेलेल्या दागिन्या मध्ये १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा गळ्यातील नेकलेस, ७० हजार रुपये किंमतीला एक तोळे वजनाचा गळ्यातील लक्ष्मीहार, ७० हजार रुपये किंमतीचे एक तोळे वजनाचे गळ्यातील मंगळसुत्र अशा एकूण २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या दागिन्याचा समावेश आहे. ही घटना २७ ऑगष्ट रोजी सांयकाळी ४ ते रात्री साडेआठ वाजणेच्या सुमारास घडली आहे.