लेंगरेच्या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असण्याऱ्या पीर कलंदर बाबांचा ऊरुस आजपासून

हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पीर कलंदर बाबांच्या ऊरूसास आजपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. रात्री लोकनृत्य तमाशा व मशहूर कव्वाल मोईन नाजा व छोटी शबनम यांचा कव्वालीच्या मुकाबलाचा बहारदार कार्यक्रम दर्गा ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला आहे. दि. ६ रोजी पहाटे मानाचा गलेफ व संदलचा कार्यक्रम प्रमुख मानकरी मच्छिंद्र जालिंदर शिंदे पाटील व दर्गा सरपंच अशमुद्दीन बहरुदिन पिरजादे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मानाच्या बैलगाड्यासह पूर्वपार चालत आल्यानुसार धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे मानाचा गलेफ व संदलचा धार्मिक विधी होणार आहे.  दि.६ रोजी दुपारी २ वाजता यात्रा कमिटीचे अध्यक्ष मधुकर पाटील, मच्छिंद्र शिंदे पाटील, सुभाष शिंदे पाटील, अमृतराव नाईक निंबाळकर व अशोक भादुले व सर्व भाविकांच्या उपस्थितीत मानाचा बैलगाडा पळवण्यास प्रारंभ होतो. तसेच रात्री नटखट सुंदरा दीप्ती आहेर यांचा भरदार नृत्याचा कार्यक्रम आहे. दि. ७ रोजी मानाचा गलेफ आहे.

भव्य कुस्ती मैदान यात्रा कमिटी व कुस्ती कमिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. रात्री साडेनऊ वाजता झंकार ऑर्केस्ट्रा यांचा बहरदार कार्यक्रम आहे. मंगळवार दि. ८/४/२५ रोजी हैदर बाबांची गाड्यांसह सवाद्य मिरवणूक पार पडेल. दि.९ रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.