यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

येथील पंचगंगा नदीवरील वरदविनायक गणेश मंदिर परिसरात असलेल्या बाथरुमच्या मागील बाजूस सुरुच्या झाडाला मफलरच्या सहाय्याने गळफास घेऊन यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केली. मल्लीकार्जुन राजाप्पा म्हेत्रे (वय ४१, रा. गुरुकृपानगर, गल्ली नं. ८) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. मल्लीकार्जुन म्हेत्रे यांनी गळफास लावून घेतल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आयजीएम.. रुग्णालयाच्या शवागृहात पाहणी केल्यावर मृतदेहाची ओळख त्याचा भाऊ विरेश राजाप्पा म्हेत्रे यांनी केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे