सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी आ . गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी दि . ११ जुन रोजी मंत्रालयात बैठक बोलवली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माजी संचालकांच्या काळात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात अली होती . त्या अनुशंगाने शासनाने बँकेच्या मागील कारभाराची चौकशी केली. त्यात तत्कालीन संचालक मंडळाच्या निर्णयामुळे बँकेला ५० कोटीचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुलीसाठी कलाम ८८ अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली. मात्र मागील वर्षी तत्कालीन सहकारमंत्र्यांनी या चौकशीला स्थगिती दिली होती. दोनच दिवसांपूर्वी विद्यमान सहकार मंत्र्यांनी चौकशीवरील ही स्थगिती उठवली . विधानपरिषेदेच्या हिवाळी अधिवेशन २०२४ मध्ये आ. गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी प्रश्न उपास्थित केला होता. त्यावेळी याबाबत सहकार मंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दुधावर दि . ११ रोजी सकाळी १२. ३० वाजता मंत्रालयात सहकार मंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. बैठकीला सहकार राज्यमंत्री , आ पडळकर यांच्यासह सहकार विभागाचे प्रधान सचिव , सहकार आयुक्त , अप्पर निबंधक , जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
