अथणी (कर्नाटक) येथून प्रतिबंधित गुटखा (Gutkha) सांगोला येथे विक्रीसाठी घेऊन येत असताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पिकअप वाहन पकडून चालकास ताब्यात घेतले. या कारवाईत १८ लाख ५१ हजार २८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन असा २५ लाख ५१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही करावाई रविवार , दि .२२ जून रोजी रात्री ९. १५ च्या सुमारास कडलास (ता. सांगोला ) येथे केली. याबाबत , अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलीप मस्के (रा. महूद ता. संगोला) या दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. तसेच पथकाने वाहन सह चालक अजय सदाशिव कोळेकर (रा. महूद ता. सांगोला) यास अटक केली आहे.
