व्यसनमुक्ती दूत पुरस्कार अनिस जमादार यांना जाहीर

इचलकरंजी येथील सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारे अनिस आदम जमादार (Anis Adam Jamadar) यांना समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफिल प्रायव्हेट लिमिटेड, शिवशंभो निवासी व्यसनमुक्ती केंद्र यांच्या वतीने व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१५ पासून देशभर व्यसनमुक्ती, मधुमेह मुक्ती, रोगमुक्ती, शिशुरक्षा व वेदना मुक्ती अशा महत्वाच्या विषयावर या संस्थांचे व्यापक कार्य सुरु आहे. संस्थेचे हे अभियान घरोघरी पोहचवण्यासाठी अनिस जमादार हे देखील कार्यरत आहेत. त्यांनी या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने घरोघरी भेटी देवून त्यामधील सुमारे ६०० लोकांना त्यांनी व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त केले आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच अनिस जमादार यांची व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण २९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.