रायगड समूहातर्फे २०० सिडबॉलचे बीजारोपण

येथील रायगड नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ७९ व्या स्वातंत्र दिनानिमित्त संस्थापक चेअरमन संभाजी सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून २००० हून अधिक सिडबॉलचे (Seedballs) बीजारोपण करून वृक्षारोपणसारखा अभिनव उपक्रम राबविण्यात आला .

राज्य शासनाच्यावतीने ३३ कोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शासकीय , निमशासकीय कार्यालय , सामाजिक संस्था , संघटनांच्या माध्यमातून खुल्या जागांवर , डोंगरांवर , रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे काळजी गरज आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा राहावा , या हेतूने रायगड नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सीड बॉल तयार केले व ते तयार केलेल्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रायगड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तुषारराजे सूर्यवंशी , अप्पासाहेब नायकवडी , जयकुमार रुकडे श्रीपाल खोत , प्रकाश इंगवले , संजय झटकरकर , प्रभाकर जाधव ,आप्पासो माळी उपस्थित होते.