महिलांच्या आरोग्यासाठी योगा महत्वाचे – भाग्यश्रीताई शिंदे

महिलांसाठी सम्बोधी फौंडेशन राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून महिलांच्या आरोग्यासाठी योगा महत्वाचे आहे. महिलांनी कुटुंबाच्या जबाबदारी बरोबर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महिलांनी आरोग्यदृष्ट्या समक्ष राहण्यासाठी रोज योगा करावे , असे आवाहनही वाळवा पंचायत समितीच्या माजी उपसभापती भाग्यश्रीताई शिंदे यांनी केले .आष्टा येथील सम्बोधी फौंडेशन आयोजित ३० दिवसीय योगा अभ्यास शिबिराच्या सांगता समारंभात त्या बोलत होत्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्ज्वला पाटील या होत्या . शिबिरामध्ये डॉ. भारती तुकाराम साकेकर यांनी मार्गदर्शन केले. समारंभात सम्बोधी फौंडेशनचे अध्यक्ष मनिष साकेकर यांनी फौंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. याप्रसंगी स्वरांगी कांबळे , स्वप्नील सुजाता वीरभक्त , रंजना सुधा कांबळे , उषा कांबळे , अक्षय वरणे उपस्थित होते. रोहन कांबळे यांनी आभार मानले .