आटपाडी तालुक्यातील दिघंची गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणेशोत्सव दिमाखात होत आहे. चौका – चौकात उभारलेल्या मंडपातील आकर्षक सजावट , विद्युत रोषणाई आणि भव्य गणेशमूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
यंदा अनेक मंडळांनी सामाजिक व आकर्षक रोषणाई आधारित देखावे उभारले असून , पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर दिला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भजन-कीर्तन , नृत्यस्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा तसेच बालगोपाळांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. विध्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर व महिलांसाठी स्नेहमेळावे तसेच महाप्रसादाचे आयोजन करून गणेशोत्सव अधिक रंगतदार बनविण्यात आला आहे.
डीजे मुक्त गणेश मकिरवणूक
डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळून सर्व गणेश मंडळांनी गणेश विसर्जन शांततेत करण्याचे आवाहन ग्रामपंचायत दिघंचीचे माजी सरपंच अमोल मोरे यांनी केले आहे.
