विनापरवाना क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची दाटीवाटीने व निर्दयीपणे वाहतूक करताना नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी टेम्पो पकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत २० वासरांची सुटका करण्यात आली असून १० लाखांचा टेम्पो जप्त केला. हि कारवाई गुरुवारी पहाटे २. ३० च्या सुमारास सांगोला ते कडलास जाणाऱ्या रस्त्यावर केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाफ यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी आदित्य संजय भालसिंह व निरंजन संजय भालसिंह यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी की , दोघे जण मिळून त्यांच्या ताब्यातील एमएच -१६-सीडी -३६७२ या टेम्पोच्या पाठीमागील हौदात काळ्या, पांढऱ्या रंगाच्या २० जर्सी गाईच्या कालवडी क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने कोंडून त्यांना वेदना होईल, अशा परिस्थितीत कमी रुंदीच्या जागेत लोखंडी अँगलला दोरीने बांधून चारा -पाण्याची कोणतीही सुविधा नसताना त्यांचे अमानुषपणे निर्दयीपणे कोंडून वाहतूक करत असताना मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अवैध जनावरांची वाहतूक करताना सांगोला पोलिसांनी टेम्पो पकडला
