सहकारतपस्वी गुलाबराव पाटील पुरस्काराने विजय वाजे यांचा सन्मान

जिल्हा मध्यवर्ती बँक आणि स्व. गुलाबराव पाटील प्रतिष्ठान, सांगली यांच्यावतीने देण्यात येणारा सहकार तपस्वी गुलाबराव पाटील उत्कृष्ट सचिव पुरस्कार बावची पूर्वभाग विकास सोसायटीचे सचिव विजय बाबूराव वाजे यांना मिळाला. हा पुरस्कार माजी मंत्री आमदार जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सचिव विजय वाजे यांना देण्यात आला. यावेळी सुनील भोसले उपस्थित होते.

दरवर्षी सांगली जिल्हा मध्यवर्ती बैंक आणि स्व. गुलाबराव पाटील प्रतिष्ठान, सांगली यांच्यावतीने उत्कृष्ट सचिव पुरस्कार देण्यात येतो. २०२४-२५ या वर्षाचा पुरस्कार बावची पूर्व भाग विकास सोसायटीचे सचिव यांची या विभागात द्वितीय क्रमांकासाठी निवड झाली. या निवडीबद्दल सोसायटीचे सचिव विजय वाजे यांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.