चिंचणी तालुका कडेगाव येथील देशभक्त शामराव मास्तर पाणी वापर संस्थेस उत्कृष्ट पाणी वापर संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोनहीरा मल्टीपर्पज हॉल वांगी तालुका कडेगाव येथे आय टी सी मिशन सुनहरा कलांतर्गत श्रमजीवी जनता सहायक मंडळाच्यावतीने उत्कृष्ट पाणीवापर संस्था’, कृषिरत्न शेतकरी व उत्कृष्ट शेतकरी गट हे पुरस्कार ताकारी उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याहस्ते आले. यावेळी प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रकल्प समन्वयक रामचंद्र कोळेकर, कार्यक्रम अधिकारी सुरेश पोळ उपस्थित होते. यावेळी सतीश सुपनेकर (शिवणी), भगवान खंडागळे (विहापुर), प्रशांत थोरात (बोंबाळे वाडी), सुनील पाटील ( हिंगणगाव खुर्द) या शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्काराने गौरविले.
यावेळी खेराडे विटा येथील शेतकरी गटाचा उत्कृष्ट शेतकरी गट पुरस्काराने सन्मान केला. जलसंपदा विभाग सांगली व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांच्यावतीने एकात्मिक ऊस व्यवस्थापन विषयावर डॉ. ए. व्ही. कडलग, प्रा. पी. पी. शिंदे, प्रा. बी. एच. पवार यांनी मार्गदर्शन केले.