वरदविनायक सामाजिक संस्थेच्यावतीने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेची माहिती व उद्योग मंथन शिबीर रविवार, दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता जय मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती वरदविनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामीण भागातील मराठा समाजातील युवकांनी उद्योजक बनावे. त्यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेची माहिती होऊन मार्गदर्शन व्हावे, यासाठी वरदविनायक सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता जय मल्टीपर्पज हॉलमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना माहिती, मार्गदर्शन व उद्योग मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे उपस्थित राहून युवकांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेशी संलग्न असणाऱ्या बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या शिबिराचा लाभ तरुणांनी आणि उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन अमोल शिंदे यांनी केले आहे.