उद्या सोमवारी 5 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती या गटाचे वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील यांनी दिली आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते तर जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.