इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माधुरी सातपूते यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्षपदी माधुरी सातपुते यांची तर कार्याध्यक्षपदी बानुबी पठाण यांची निवड झाली.

प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले. महिलांचे संघटन आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड केली. निवडीसाठी जिल्हाध्यक्षा अश्‍विनी माने, जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रांतिक सदस्य मदन कारंडे, महानगर जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे, कार्याध्यक्ष उदयसिंग पाटील यांचे सहकार्य लाभले.