सांगली जिल्हा हा तर सगळीकडे नावारूपास आहेच. तसेच सांगली जिल्ह्यातील काही गावे दुष्काळ गावे म्हणून देखील ओळखतात. सांगली जिल्हा स्थापनेच्या पंचाहत्तरीपर्यंत जिल्ह्याची सर्व क्षेत्रात सर्वार्थाने चौफेर प्रगती होऊन तो समृद्ध व्हावा, हे आमदार जयंत पाटील यांचे स्वप्न असून तशी त्यांची वाटचाल सुरू आहे.
त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांत सांगली जिल्हा सर्वच क्षेत्रांत, देशात अव्वल होईल, अशी भावना राष्ट्रवादी ओबीसी विभाग प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी व्यक्त केली.
ते एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आटपाडी येथे प्रभाग भेट कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ते विकासराव देशमुख, य.पा. वाडीचे सरपंच संभाजीराव माने, असिफ कलाल आदी मान्यवर उपस्थित होते.