इस्लामपूर येथील मुख्यमंत्री दौरा स्थगित

शासन आपल्या दारी यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी इस्लामपुर दौऱ्यावर येणार होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इस्लामपुरातील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम स्थगित झाला आहे. येत्या रविवारी (दि. २५)
तो नियोजित होता. तो काही कारणास्तव स्थगित झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांनी दिली.

हा कार्यक्रम आता ८ मार्च रोजी घेण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच होमग्राउंडवर स्वतः मुख्यमंत्री येत असल्याने दौऱ्याविषयी उत्सुकता होती. दौऱ्यादरम्यानच्या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.