राज्यात एकीकडे उष्णता तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा!

राज्याच्या हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळतोय. उत्तर भारतामध्ये तापमानाचा पारा वर चढत आहे. तर, महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता (Rain) वर्तविली जात आहे.वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पुढील २४ देशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. राज्यात सध्या उन पावसाचा खेळ सुरू असल्याचं दिसत आहे. एकिकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे, तर दुसरीकडे विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान खात्याने पुढील २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंशांचा पारा ओलांडला आहे. आज सध्या राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला (Maharashtra Weather)आहे. आज अकोला येथे देशातील उच्चांकी म्हणजेच ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचं चित्र (Summer) आहे. आज आणि उद्या नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर

आज पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि (Maharashtra Weather Update) भारताच्या वायव्य लगतच्या मैदानी भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. मागील 24 तासांत जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली.