शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशाला सुरवात झालेली आहे. पाल्यांच्या प्रवेशासाठी दर्जेदार शाळा-महाविद्यालयांचा शोध पालकवर्ग घेत आहे. तसेच ज्यांचे पाल्य शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकतात, त्यांची नव्या वर्षाच्या तयारीसाठी धावपळ सुरू आहे.तथापि, कोणते प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, ती कशी मिळवावीत, याची ही माहिती.
जात प्रमाणपत्रटीसी, बोनाफाईड सर्टिफीकेट (४, १०, १२), जन्म प्रमाणपत्र, वडीलांची टीसी तसेच अशिक्षित असल्यास तसा दाखला, रहिवासी दाखला कोणताही एक, रेशन कार्ड, घरटॅक्स पावती चालू व १५ वर्षांपूर्वीची, सात बाराचा उतारा व गाव नमूना – ८, पाच नातेवाईकांचे जातीचे प्रमाणपत्र, वंशावळी, आधार कार्ड , पासपोर्ट फोटो, जातीची नोंद असल्याचा पूरावा ( अनुसूचित जाती, जमातीसाठी १९५० पूर्वीचा, ओबीसीसाठी १९६७ पूर्वीचा तर भटकी जमात ब,क,ड साठी १९६१ पूर्वीचा)सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत केलेली असावीत.हे प्रमाणपत्र ४५ दिवसात मिळते.
वय-राष्ट्रीयत्व-अधिवास प्रमाणपत्रटीसी, बोनाफाईड सर्टिफीकेट (४, १०,१२) , जन्म प्रमाणपत्र, वडीलांची टीसी तसेच अशिक्षित असल्यास तसा दाखला, रहिवासी दाखला कोणताही एक, रेशन कार्ड, घरटॅक्स पावती चालू व १५ वर्षांपूर्वीची, ग्रामपंचायत गाव नमुना – ८, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, स्थलांतरीत व्यक्ती असल्यास बाॅर्डस सर्टीफिकेट.सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत केलेली असावित.प्रमाणपत्र १५ दिवसांत मिळते.
दहा टक्के आरक्षणाचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रटीसी, बोनाफाईड सर्टिफीकेट (४, १०, १२), जन्म प्रमाणपत्र, वडीलांची टीसी किंवा अशिक्षित असल्यास तसा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, तीन वर्षांचे तहसीलदारांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (कोणताही एक), रेशन कार्ड, घरटॅक्स पावती चालू व १५ वर्षांपूर्वीची, ग्रामपंचायत गाव नमुना -८, सातबारा, नमुना-८ अ, आधार कार्ड ,पासपोर्ट फोटो.सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत केलेले असावेत. हे प्रमाणपत्र ७ दिवसात मिळते.
नॉनक्रिमीलेयर सर्टिफिकेटटीसी, बोनाफाईड सर्टिफीकेट (४, १०, १२), जन्म प्रमाणपत्र, वडीलांची टीसी किंवा अशिक्षित असल्यास तसा दाखला, तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलेयर व सेंट्रल कास्टसाठी), रहिवासी दाखला (कोणताही एक), स्वतःचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो. जातीची नोंद असल्याचा जातदर्शक पुरावा. (अनुसूचित जाती, जमातीसाठी १९५० पूर्वीचा, ओबीसीसाठी १९६७ पूर्वीचा तर भटकी जमात ब, क, ड (एनटी) साठी १९६१ पूर्वीचा)सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत केलेली असावीत. प्रमाणपत्र २१ दिवसात मिळते.
रहिवासी प्रमाणपत्र
आधार कार्ड, टीसी. सात दिवसात हे प्रमाणपत्र मिळते.
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
ओळखीसाठी ः आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक.
महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. केंद्रचालक नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडचणीशिवाय घेऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही.
यासाठी शासनाकडून https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Login ऑनलाईन सेवेसाठी हे पोर्टल देण्यात आले असून या पोर्टलवर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत.