सोलापूर महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, याकरीता सन २०२३ मध्ये राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर सात सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने ३१ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२४ अंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे व ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार असून त्यातून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशात्सव मंडळांस रुपये ५ लाख, द्वितीय क्रमांकास रुपये अडीच लाख व तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरीत ४१ जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजारचे पारितोपिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत धम दिाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना सहभागी होता येईल. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra. gov.in संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या चौकटीत स्पर्धा निवडीचे निकष व अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.