कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा दमदार पाउस, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले….

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.मोसमात पुन्हा एकदा पंचगंगा नदी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे.राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडले आहेत.वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने विसर्ग करण्यात येणार आहे.दुपारी दोन वाजल्यापासून 2465 क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील लघू आणि मध्यम अशी बहुतांश धरणे भरली गेली आहेत.अलमट्टी धरणामध्येही 90 टक्के साठा असून 54 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे.कोयना धरणामध्येही 90 टक्के साठा झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे.