अ.लाटच्या जिनेंद्र सांगावेला डबल चॅम्पियनशिप

एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रैक चॅम्पियनशिप २०२४ व एमआरएफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ या टू व्हिलर बाइक स्पर्धेत अ. लाट (ता. शिरोळ) येथील सोळा वर्षीय जिनेंद्र सांगावे याने फॉरेन बाइक ग्रुप ए २५० सीसी विभागात देशात प्रथम क्रमांक मिळवत डबल चॅम्पियनशिपचा बहुमान पटकावला. स्पर्धा श्याम कोठारी व गॉडस्पीड टीम (पुणे) यांच्यातर्फे आयोजिल्या होत्या. यात बाइक स्पर्धा मध्ये जिनेंद्र सांगावे याने फॉरेन बाइक ग्रुप ए २५० सीसी विभागात ज्युनिअर गटात भाग घेतला होता. या स्पर्धा कोइमतूर, नाशिक, कोल्हापूर, बडोदा, जयपूर, नागपूर, भोपाळ, बंगळुरु, आणि कोचिन या १० शहरामध्ये आयोजित केल्या झाल्या. सर्व प्रथम एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप मध्ये कोल्हापूर, बडोदा, जयपूर, आणि नागपूर या ठिकाणी झाल्या. या चार ही स्पर्धा जिनेंद्रने प्रथम क्रमांकाने जिंकल्या.

नागपूर येथे झालेल्या स्पर्धेनंतर जिनेंद्र सांगावे डर्ट ट्रॅक चा नॅशनल चॅम्पियन घोषित झाला. यानंतर एमआरएफ नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप २०२४ मध्ये एकूण ६ रेस होत्या. या स्पर्धा कोइमतूर, नाशिक, भोपाळ, पुणे, बंगळुरु, आणि कोचिन येथे झाल्या. त्यातही जिनेंद्रने ६ पैकी ६ रेस जिंकून कोचिन (केरळ) येथे अंतिम स्पर्धेमध्ये सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियन ठरला. स्पर्धेसाठी ‘प्रायोजक म्हणून एक्सोर हेल्मेट कंपनी बेळगावी, जोल्ले ग्रुप एकसंबा, प्रकाश आवाडे क्रीडा प्रतिष्ठान, मोहिते रेसिंग अकॅडमी यांचे सहकार्य मिळाले. प्रीतम पाटील, कुंतीनाथ बरगाले, दिलावर बैरागदार, रियाज शेख यांचे प्रोत्साहन पिंकेश ठक्कर, सोहम दळवी, सचिन घोरपडे, विराज कोथळे यांचे मार्गदर्शन मिळाले.