खासदार धैर्यशील माने यांचा सरकारला सवाल………

लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी अनेक विकास कामांना प्राधान्य दिले. ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या फेक यूनिवर्सिटी चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आज लोकसभेत हा मुद्दा उचलून धरला. फसव्या जाहिरातींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना आकर्षित करून त्यांना फेक यूनिवर्सिटीच्या जाळ्यात अडकवले जाते ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान तर होते. परंतु त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यासाठीही मोठा धोका निर्माण होतो असा आरोप त्यांनी केला.

खासदार माने यांनी या संदर्भात सरकारला विचारले की देशातील फेक युनिव्हर्सिटी वर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार कोणते ठोस धोरण राबवणार आहे. अशा फसवणुकीला काळा घालण्यासाठी आणि तरुणांचे नुकसान टाळण्यासाठी कोणती कार्यवाही केली जाणार आहे तसेच या समस्येचे गांभीर्य ओळखून अशा फेक युनिव्हर्सिटीच्या जाहिरातीवर त्वरित बंदी आणावी व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणीही त्यांनी केली.