प्रत्येक भागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याला उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला मिळतो. तसेच अनेक भागात विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते. हुपरी नगरपरिषद हुपरी महोत्सवांतर्गत रन फॉर ग्रीन हुपरी या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी इचलकरंजीच्या संकेत संजय गुरव ठरला तर द्वितीय राहुल सुरेश लवटे तृतीय कुलदीप रवींद्र पाटील (साजणी) व आशुतोष संजय भातमारे यांनी पटकावला. हुपरीचे पीआय एन. आर. चौखंडे यांच्या हस्ते ध्वज दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याधिकारी अजय नरळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला न विजेत्या स्पर्धकांबरोबरच सोनाली संजय माळी व विजया सुरेश वाईगडे या सहभागी महिला धावपटूंना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पन्हाळा नगरपरिषद मुख्याधिकारी चेतन माळी, उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, उद्योजक सतीश भोजे प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ, ९४ ग्रुपचे अमोल गाट, सचिन शिरदवाडे व इतर सहकारी, रोहितकुमार कनवाडे, पर्यवेक्षक डॉ. ज्योती पाटील, लेखा परीक्षक अशुमती झांबरे, निखिल चव्हाण, तेजस जाधव, मिरा शिंगे, दिगंबर डोंगरे, उदय कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रथमच आयोजित केलेल्या या हुपरी महोत्सवाला नागरिकांचा व महिला भगिनींचा अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. तर महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्राची गाथा या संगीतमय कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. एकंदरीत हुपरी महोत्सव अतिशय यशस्वीरित्या व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने हुपरी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामकाज कौतुकास पात्र ठरले आहे.