सोलापूर विद्यापीठातील भोंगळ कारभार उघडकीस..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परीक्षा निकालांचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांना ५० पैकी ९९ गुण दिल्याने विद्यार्थीही चक्रावले आहेत. बीएससी सेमिस्टर तीनच्या निकालातील प्रकारामुळे विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक धक्का बसला आहे.

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात काही विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परीक्षेत एका विषयाला ५० हून अधिक गुण दिले आहेत. हा निकाल समोर येताच विद्यार्थ्यांसह पालक चकीत झाले आहेत. विद्यापीठाकडून १३ डिसेंबर २०२३ पासून २२ डिसेंबरपर्यंत बीएससी सेमिस्टर ३ च्या परीक्षा पार पडल्या. यामध्ये विद्यापीठाने ४० गुणांचा लेखी पेपर तर १० गुणांची असाइनमेंट अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली होती.

५ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात झालेल्या चुकामुळे विद्यार्थी चांगलेच चक्रावले आहेत. क्लेरीकल चुकीमुळे हे घडल्याचं समोर आलं आहे.