इस्लामपूर मधील काही शाळांमधून प्रवेशासंबंधाचे नियम मोडून विद्यार्थी आणि पालकांची नाहक आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. शालेय देखभाल दुरुस्तीचा खर्च म्हणून शुल्काच्या रूपात पालकांकडून वसुली होत आहे. या अवाजवी शुल्कामुळे गोरगरीब व सामान्य कुटुंबातील मुलांवर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन पालकांना दिलासा द्यावा. अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांकडून भरमसाट शैक्षणिक आणि इतर शुल्क आकारणी करणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांना दिले आहे. यावेळी डॉ. भगवान पाटील, संदीप भिलार, माणिक पाटील, विनायक कुटे उपस्थित होते. या निवेदनात विविध शाळांमधून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.