रविवार गुढीपाडवा आहे आणि सोमवार रमजान ईद आहे. त्यामुळे सगळीकडे सार्वजनिक सुट्टी आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचे घरफाळा व पाणीपट्टी १००% वसुली करिता इचलकरंजी महानगरपालिका मुख्य कार्यालय तसेच सर्व विभागीय कार्यालय शनिवार दि. २९/०३/२०२५, रविवार दि. ३०/०३/२०२५ ( गुढी पाडवा) आणि सोमवार दि. ३१/०३/२०२५ (रमजान ईद) असे तीनही दिवस दिवशी कर भरणा करिता पूर्ण वेळ सुरु राहणार आहे.
तसेच आर्थिक वर्षाअखेर विचारात घेता महानगरपालिकेची सर्व कार्यालयांचे कामकाज तीनही दिवस चालू राहणार आहे. याची शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी आणि आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी मुदतीत भरून दंडात्मक कारवाई व जप्ती सारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे.